प्रदीप नणंदकर

लातूर : पाणी आणि शिक्षण या लातूरकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रश्नांसाठी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे आगामी काळात संघर्ष करणार आहेत. १५ ऑगस्टला बाईक मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. लातूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न हा आजही बिकट आहे येथील शिक्षणाची गुणवत्ता असली तरी रोजगाराची समस्या आहे आणि हे दोन प्रश्न धसास लावण्यासाठी  रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी

निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथे आयोजित मेळाव्यात ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते . ते म्हणाले मी गेले २२ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. दिलेला शब्द पाळण्यासाठी वाटेल ती किंमत मी चुकवतो. इतकी वर्ष मी राजकारणात असूनही लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा सुटत नाही .जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नळाने पाणीपुरवठा करायचा असेल व पावसाचे वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते साठवून नदीच्या पात्रात सोडायचे असेल तर एकटय़ा लातूर जिल्ह्यासाठी दीड लाख कोटी रुपये लागणार आहेत .एवढे पैसे आपल्याला कोणी देणार आहे का ?ते सहज मिळणार आहेत का ? हा प्रश्न लोकांसमोर, सरकापर्यंत पोहोचला तर पाहिजे ? लातूरच्या शिक्षणाचा लौकिक राज्यात नव्हे तर देशात आहे.

सलग ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ लातूरकरांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यावर्षी दहावीच्या राज्यातील शंभरपैकी १०० गुण घेणाऱ्या १५१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०८ विद्यार्थी हे लातूरचे आहेत .इतकी मोठी शिक्षणाची परंपरा असूनही शिकून कोणी डॉक्टर ,इंजिनीयर व अन्य बाबीत पुढे गेला तरी तो पुन्हा लातूरला येणार आहे का? त्यांच्या रोजगाराचे काय ? आज गावातील शिकलेली मुले येथे राहायला तयार नाहीत. कारण गावात राहण्यासाठी जी लागणारी सुविधा आहे ती त्यांना मिळत नाही .रोजगार मिळत नाही .लातूरला केंद्रीय विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी लढा उभारावा लागेल .कुठल्याही गोष्टीसाठी केवळ मुंबईपर्यंत धडका मारून उपयोग नाही. आपल्या गावात आपली ताकद दाखवली पाहिजे. १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५० हजार तरुण दुचाकीवरती तुळजापूपर्यंत जातील व तेथे देवीला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालतील .जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष जाणार नाही.

मताधिक्य देऊ, प्रश्न सोडवा

मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आहेत. मागच्या लोकसभेच्या वेळी तीन लाख मताने खासदार निवडून आले. यावेळी चार लाखांचे मताधिक्य देऊ पण आमचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. या प्रश्नाचे गांभीर्य सरकारने समजून घेतले पाहिजे. यासाठीच आपण सर्वाना संघटित करून काम करणार आहोत. यामध्ये राजकारण करणार नाही. राजकारणविरहित सर्वजणांना सोबत घेऊन ही चळवळ उभारण्याची आपण तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. निलंगेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने केलेल्या घोषणेमुळे जिल्ह्याचे नेतृत्व पुन्हा आपणच करू असे त्यांनी सूचित केले आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालण्याचे त्यांनी ठरवले आहे, याला प्रतिसाद कसा मिळतो यावर त्यांचे राजकारण अवलंबून असेल.