ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून विधानसभेत सोमवारी मोठा गदरोळ झाला. या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री छगन भूजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकचं गोंधळ घातला. त्यानंतर पिठासीन अधिकारी भास्कर जाधव अध्यक्षांच्या दालनात गेले. यावेळी भाजपाच्या १२ आमदारांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर निलंबित भाजपा आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची योजना आखल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यपाल किंवा न्यायालयाला विधिमंडळातील कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. त्यांना तसा संविधानिक अधिकार नाही, असे मत घटनातज्ज्ञांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा