पश्चिम महाराष्ट्रात तातडीने जाणाऱ्या अजित पवारांनी विदर्भात येण्यास उशीर केला अशी टीका भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. अजित पवार पूरग्रस्त तसंच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी ही टीका केली. अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’मधील मुलाखतीवरुन देखील टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांवर टीका

“नेहमीप्रमाणे अजित पवारांनी फार उशीर केला. देवेंद्र फडणवीस तातडीने हिंगणघाटला गेले होते, विदर्भात फिरले. कधी नव्हे तितक्या तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळाली असून पंचनामेदेखील झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात इतकाच हाहाकार माजला असता तर अजित पवार तातडीने गेले असते. पण सत्तेत असो किंवा नसो, विदर्भात येताना यांना उशीर होतो,” असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. विदर्भाला मदत मिळण्यात विरोधी पक्षाचाही हातभार लागला तर आनंद असेल असंही ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी उल्लेख केलेल्या पदाची, म्हणाले “महाराष्ट्राचे…”

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ‘पालापाचोळा’ म्हटलं असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले “आपल्याच पक्षातून गेलेल्या लोकांना बोलताना त्यांनाही दु:ख होत असेल. सगळं शेतच जर पाखरांनी खाल्लं असेल, तर शेतकऱ्याने कितीही कपाळावर हात मारला आणि पालापाचोळा म्हटलं तरी उपयोग नाही”.

अमरावतीचा ‘टेक्सटाईल पार्क’ औरंगाबादला पळवण्याचे नवीन सरकारचे षडयंत्र; कॉंग्रस नेते डॉ.सुनील देशमुख यांचा आरोप

माजी राज्‍यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्‍यक्ष डॉ.सुनील देशमुख यांनी अमरावतीमधील नांदगांवपेठ येथील औदयोगिक वसाहतीत पीएम-मित्रा योजनेअंतर्गत प्रस्तावित ‘टेक्सटाईल पार्क’ औरंगाबाद येथील ऑरिक सिटी मध्ये पळवण्याचे कारस्थान रचण्यात आले असून हे नवीन सरकारचे षडयंत्र असल्‍याचा आरोप केला आहे. त्यावरही अनिल बोंडे यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंनी ‘पालापोचाळा’ म्हणत टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आमची लायकी…”

“सुनील देशमुख यांनी माहिती घेतली पाहिजे. १३ राज्यांमधून १८ प्रस्ताव गेले असून महाराष्ट्रातून दोन आणि मध्य प्रदेशातून चार प्रस्ताव गेले आहेत. काँग्रेसप्रमाणे एका राज्याला एकच मिळेल असं नाही,” असा टोला त्यांनी लगावला. “काँग्रेसवाले कोंडीत सापडले असून थोडी जरी माहिती आली तरी बरळायला सुरु करतात. सुनील देशमुख अभ्यासू असून त्यांनी या भानगडीत पडायला नको होतं,” असा सल्लाही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp anil bonde ajit pawar vidarbha western maharashtra sgy
Show comments