अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने उच्चशिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा धक्कादायक आरोप भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती खासदार बोंडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती संस्था व वकील बोगस असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुस्लीम समुदायला गंभीर इशारा दिला आहे. आपली पोरं सांभाळा, ते जबरदस्तीने हिंदू मुलीशी लग्न करत आहेत. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

या घटनेची अधिक माहिती देताना बोंडे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील हिंदू मुलीची रुग्णवाहिका चालक मुस्लीम मुलानं दिशाभूल केली आहे. पीडित मुलीचं बीएससी शिक्षण झालं असून मुस्लीम मुलगा नववी उत्तीर्ण आहे. मुस्लीम मुलानं २९ ऑगस्ट रोजी हिंदू मुलीला भूलथापा देऊन पळवून नेलं. अमरावतीला गेल्यानंतर येथील एका बोगस संस्थेद्वारे लग्न लावल्याचं प्रमाणपत्र दिलं. त्या प्रमाणपत्रावर काझीचं नाव नाही, केवळ सही आहे. या संस्थेला लग्न लावण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु पैसे घेऊन लग्न लावल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं, असा आरोप बोंडे यांनी केलं आहे.

हेही वाचा- पंजाब : सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चची तोडफोड; कारला लावली आग, परिसरात तणाव

पुढे बोंडे म्हणाले की, दुर्दैवाची बाब म्हणजे धारणी येथील पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. दोघांचं लग्न झाल्याचं सांगून त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला. कालपासून ती मुलगी मला माझ्या आई वडिलांकडे जायचं आहे, असं म्हणत आहे. अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना अतिशय मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महाविद्यालयासमोर गाड्या घेऊन ही मुलं मुलींना त्रास देतात. मुलींना पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी या मुलांना त्यांच्या समाजाचं पाठबळ मिळतं, असे आरोपही बोंडे यांनी केले आहेत.

हेही वाचा- भाजपा नेत्यानं आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडलं, आरोपांनतर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

माझी मुस्लीम बांधवांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पोरांना सांभाळावं. अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होतो. मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर समाजातील लोकांनी फटाके फोडले, ही अतिशय निषेधाची बाब आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील मोठ्या लोकांनी आपल्या मुलांना सांभाळावं, हे लव्ह जिहाद आणि प्रेमात अडकवण्याचं नाटक ताबोडतोब बंद करावं, याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार अनिल बोंडे यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp anil bonde on love jihad in amravti muslim man married with hindu educated young woman rno news rmm
Show comments