महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.३१ जुलै रोजी तशी अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. अध्यक्षपदाचे अन्य उमेदवार काकासाहेब पवार व धवलसिंग मोहिते पाटील यांनी अर्ज परत घेतल्याने तडस यांच्या निवडीची औपचारिक घोषणाच बाकी आहे.
शरद पवारांना धोबीपछाड देत खुर्ची पटकावली –
या संघटनेवर आतापर्यंत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचाच वरचष्मा राहला. मात्र, त्यांचे कधीकाळी राजकीय शिष्य राहलेल्या तडस यांनीच त्यांना धोबीपछाड देत खुर्ची पटकावली आहे. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पवारांच्या अध्यक्षतेतील राज्य कार्यकारिणी तक्रारी असल्याचा ठपका ठेवत बरखास्त केली होती. त्यामुळे लगेच निवडणूक लावण्यात आली.
३१ जुलै रोजी कागदोपत्री निकाल जाहीर केला जाणार –
निवृत्त न्यायाधीश अशोक शिवणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहले. तडस अध्यक्ष व त्यांचेच १२ समर्थक आता नव्या कार्यकारिणीत राहतील. २९ जुलैला त्यांची बैठक होणार असून ३१ जुलै रोजी कागदोपत्री निकाल जाहीर केला जाणार.