राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवारांनी काँग्रेसची तुलना नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासोबत केल्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून हे सोयीचं राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नाही अशा शब्दांत टीका केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसनं आता स्वीकारावं की ते आता जमीनदार राहिलेले नाहीत, असं म्हटलं.

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Image Of Manoj Jarange And Prakash Ambedkar
Manoj Jarange : “आमच्यात वर्चस्वाची लढाई वगैरे…”, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जरांगे पाटलांचे थेट उत्तर
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी!

“काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे,” असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.

नारायण राणेंची टीका –

“शरद पवार कधी काय बोलतील….एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचं. हा प्रकार काय आदर्श राजकारणी म्हणणार नाही. हे सोयीचं राजकारण आहे,” अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा!

फडणवीसांचा टोला –

“काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसला खोचक टोला लगावला.

Story img Loader