वाई : जावळी, महाबळेश्वर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या मेढा बाजार समितीत भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या आहेत. जावळी, महाबळेश्वर बाजार समितीत महाविकास आघाडी पॅनलचा दारुण पराभव झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची रणनीती यशस्वी ठरली. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी विकास पॅनलने एक हाती सत्ता मिळवत या निवडणुकीत सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. यंदा ही निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत लढवली होती. मेढा बाजार समितीचे मतदान शुक्रवारी पार पडले. यामध्ये १८ पैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने ही निवडणूक एकत्र लढवली. या पॅनेलच्या विरोधात महाविकास आघाडी, ठाकरे गट, राष्ट्रवादीचा दुसरा गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन लढले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील या तिघांनी एकत्र येत मेढा बाजार समितीवर यश मिळविले. सातारा जिल्ह्यात भाजपाने राष्ट्रवादीबराेबर एकत्र येत निवडणुकी लढल्याचे समीकरण पाहायला मिळाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ यांनी एकत्र येत त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र केलेल्या शेतकरी विकास पॅनलला भरभरून मते दिल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विरोधकांना मेढा बाजार समितीत खातेसुद्धा उघडता आलेले नाही, तर भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आठ, एनसीपीचे आमदार मकरंद पाटील यांना पाच तसेच आमदार शशिकांत शिंदेंना पाच जागांवर विजय मिळाला आहे.

हेही वाचा – VIDEO : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

महाविकास आघाडीचे दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या युतीचा दारुण पराभव झाला आहे. त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. हा विजय आगामी राजकीय गणित मजबूत करणारी असल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्याबरोबर केलेली हातमिळवणी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी फायद्याची ठरली आहे. साताऱ्याचे राजकारण हे राजकीय पक्षापेक्षा नेत्यांच्या गटातटावर चालते हे पुन्हा सर्वश्रुत झाले.