नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. पूर्ण ताकदीने राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरुनही महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर आता २० जून म्हणजेच येत्या सोमवारी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून बैठका आणि आमदारांची जमवाजमव सुरु झाली आहे. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भाजपानेदेखील आपले आमदार जमवले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार पक्षांच्या आमदारांना चार हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले असून चारही पक्ष आकडेमोडीमध्ये व्यग्र आहेत. मुंबईमध्ये बैठकांचं सत्र सुरु झालं आहे.

हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Pankaja Munde
Pankaja Munde : महायुतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरुन दोन मतप्रवाह; अजित पवारानंतर आता पंकजा मुंडेंनीही मांडली भूमिका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
union minister nitin gadkari interview for loksatta ahead of Maharashtra Assembly Election 2024
व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महाविकास आघाडीकडून यावेळी खबरदारी घेतली जात आहे. आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आपले आमदार तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले आहेत. येथे आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली जात असून पक्षातील मोठ्या नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जातंय.

हेही वाचा >> मुंबईत सेना-भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ

राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंटमध्ये असून त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये असून मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनदेखील येथेच साजरा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा >> लाचेची रक्कम घेताना पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले

दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनादेखील हॉटेल फोर सिझनमध्ये ठेवण्यात आलं असून येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. येथे आमदारांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपानेदेखील आकडेमोड सुरु केली असून या पक्षाच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवून असे भाजपाने यापूर्वी बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजपानेदेखील रणनीती आखायला सुरुवात केली असून येथे भाजपाच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथे भाजपाचे बडे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विजयी गणित जुळवत आहेत.

हेही वाचा >> आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

दरम्यान, येत्या सोमवारी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी निवडणूक ही गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच कारणामुळे चारही पक्षांनी आपल्या आमदारांना चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले असून आपापल्या स्तरावर रणनीती आखली जात आहे.