निलेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असताना निलेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांना सुनावलं आहे. “शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. पण ते नसते उद्योग करत बसतात”, असं म्हणत यावेळी एकेरीत उल्लेख करत निलेश राणेंनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “मागील १७ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. आता तर जुलै महिन्याचा पगार ऑगस्ट महिना संपायला आला तरी मिळालेला नाही. शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. पण ते नसते उद्योग करत बसतात. एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या करा.”

वेळेवर पगार मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या धुळे जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळांच्या ४५ वर्षीय चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक समोर आली. त्याचसोबाबत, वेळेवर पगार होत नसल्याने एसटीचे अनेक कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी अनिल परब यांना सुनावलं आहे.

अनिल परब विरुद्ध राणे वाद पेटणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अवघ्या काहीच दिवसांपूर्वी राज्यात वातावरण ढवळून निघालेलं असताना देखील राणे आणि अनिल परब आमने-सामने आले होते. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने उशिरा रात्री राणेंचा जामीन मंजूर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण अनिल परबांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कारण, नारायण राणेंना अटक झाली तेव्हाची अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये ते नारायण राणेंच्या अटकेबाबत बोलताना दिसून येत आले. त्यामुळे, राणे आक्रमक पवित्र्यात दिसले.

Story img Loader