सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नाव आल्याने नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी अडीचनंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजूंकडून वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना वकील संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब, प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्यासाठी असणार आहे. तर विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील.दुसरीकडे नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. त्यामुळे आता नितेश राणेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

विधिमंडळ अधिवेशन : नितेश राणे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ

विधिमंडळातही सोमवारी या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी बाजू मांडत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. तर, त्यांच्या या मागणीवर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट करत दोषींना सोडलं जाणार नाही, असे स्पष्ट केले.

संतोष परब यांचा आरोप काय –

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं आहे.

नितेश राणेंनी आपली बाजू मांडताना काय सांगितलं होतं –

“कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे,” असं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं होतं.

‘सुडाच्या राजकारणातून नितेश राणेंच्या अटकेचा प्रयत्न’

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सत्तारूढ लोकांना पराभव दिसू लागल्याने सुडाचे राजकारण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित केले जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. अ‍ॅग्रोव्हिजनच्या कार्यक्रमाला नागपुरात आले असता ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. कोणाच्याही मारहाणीशी नितेश राणे यांचा संबंध नाही. राज्य सरकारला जे करायचे ते करू द्या. नितेश राणे जिल्ह्यात आहेत. आम्हाला अज्ञातवासात जाण्याची काही आवश्यकता नाही. पण अशाप्रकारे सुडाच्या भावनेतून कारवाई झाल्यास त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही राणे म्हणाले.