भाईंदर : नाट्यगृहाच्या उदघाटणासाठी मिरा भाईंदर मध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असल्याची घटना घडली आहे. यात पालिकेने जातीने भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयन्त केला असल्याचे आरोप करत भाजप माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच ठिय्या आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… Maharashtra News Live : शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह, राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र, राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

मंगळवारी दुपारी नाट्यगृहासह पालिका मुख्यालय आणि रुग्णालयच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरा भाईंदर मध्ये आले होते.त्यानुसार विविध ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करून मुख्यमंत्री ‘गानसामग्री भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहा’त आले. त्यानंतर नाट्यगृहाचे उदघाटन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. नाटगृहाच्या उद्घाटन प्रसंगी कोणताही वाद होऊ नये म्हणून पालिकेकडून यंदा आजी -माजी सर्व लोकप्रतिनिधीना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.परंतु माजी आमदार नरेंद्र मेहता व माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे हे आपल्या सर्व माजी भाजप नगरसेवकांसह कार्यक्रम स्थळी आले असता त्यांचा प्रवेश सुरक्षा रक्षकांनी नाकारला.

हेही वाचा… एकनाथ शिंदेंना आयोगाकडून ढाल-तलवार पक्षचिन्ह, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “शत्रू अंगावर आला तर…”

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

यानंतर काही काळ वाद सुरु राहिल्यांनतर विशेष अतिथी म्हणून निमंत्रण असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांना प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी होकार दिला.तर सभागृहात जागा नसल्याचे कारण देत इतर माजी लोकप्रतिनिधीचा प्रवेश नाकारण्यात आला.यामुळे आमंत्रण दिले असताना देखील कार्यक्रमात प्रवेश दिला जात नसल्यामुळे भाजप लोकप्रतिनिधीनी विरोध केला.तर मेहतासोबत त्यांच्या समर्थकांनी नाट्यगृहाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन आणि कार्यक्रमांची पत्रिका फाडून आंदोलन केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप कडुच विरोध करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा… “लॉकडाऊन आवडतो, म्हणून दोन वर्षे सणांना बंदी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

प्रताप सरनाईकांनी बेकायदेशीर प्रवेशपत्रिका बनवल्याचे आरोप

नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी पालिका प्रशासनाकडून निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र प्रवेश पत्रिका तयार केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. परिणामी नाट्यगृहात प्रताप सरनाईकांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून माजी लोकप्रतिनिधीसाठी आरक्षित ठेवलेल्या आसनांवर ठाम मांडले. त्यामुळे भाजप पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा जागे अभावी प्रवेश नकरण्यात आला असल्याचे आरोप माजी आमदार नरेंद्र महेता यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp opposed chief ministers programme in bhayander asj
Show comments