एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ३० जून रोजी म्हणजेच उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. राज्यपालांच्या या आदेशानंतर आता भाजपा पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आले. भाजपाने आपल्या सर्वच आमदारांना आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत येण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कुलाबा येथील कफ परेडमधील प्रेसिंड हॉटेलमध्ये भाजपा आमदारांना येण्यास सांगितले आहे. टीव्ही ९ मराठीने तसे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>>> उद्या ठाकरे सरकारची परीक्षा: राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता कोश्यारी यांनी विधानसभेच्या सचिवांना येत्या ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या याच निर्णयानंतर आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आमदार मुंबईत येण्यास सुरुवातदेखील झाली आहे.
हेही वाचा >>>> उदयपूर हत्या प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘धर्माच्या नावावर…’
आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठरावाची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे. बहुमताची चाचणी कशा प्रकारे केली जाईल? ही पूर्ण पद्धत कशा प्रकारे पाड पडेल? याबाबत आमदारांना समजावून सांगण्यात येईल. तशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा >>>> उद्या ठाकरे सरकारची परीक्षा: राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव
दरम्यान, राज्यपाल यांनी विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर शिवसेनेने न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत. हे अधिवेश बेकायदेशीररित्या बोलावण्यात आले आहे. आमची कायदेशीर बाजू सांभाळणारी टीम यावर योग्य निर्णय घेईल असे शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे ३९ तर काही अपक्ष आमदार मुंबईत येण्याची शक्यता आहे. ते बहुमत चाचणीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या अग्निपरीक्षेत सरकारचे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.