नागपूर आणि अकोला विधानपरषिद जागेसाठीच्या निवडणुकांचे निकाल आज समोर आले असून त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपानं या दोन्ही जागा मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्ताधारी पक्षांचे उमेदवारच पडल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल्याची चर्चा होत असताना अकोल्यातील निकालांवरून भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यासोबतच, नागपूर विधानपरिषद निवडणूक निकालांवरून देखील प्रविण दरेकरांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“घोडेबाजार होऊनही भाजपाचा विजय”

नागपूर निवडणुकीत ऐनवेळी घोडेबाजार होऊन देखील भाजपाचाच विजय झाल्याचं दरेकर यावेळी म्हणाले. “नागपूर आणि अकोल्याच्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून ज्या निवडणुका झाल्या, त्यात राज्यातील जनतेनं प्राधान्य भाजपाला दिलं. नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपालाच पाठबळ असल्याचं दाखवून दिलं. वसंत खंडेलवाल यांच्याकडेही वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत”, असं दरेकर म्हणाले आहेत.

“राज्यकारभार करण्यात सरकार अपयशी”

“जनतेत जी प्रचंड नाराजी होती, त्याचं प्रतिबिंब नागपूर आणि अकोल्यात उमटलं. सरकार म्हणून राज्यकारभार करण्यात हे सरकार अपयशी ठरलंय, त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आलं आहे. या सरकारची सरकार चालवण्याची क्षमता नाही याची चर्चा राज्यभर होतेय हे या निवडणुकांनी दाखवून दिलं”, असं ते म्हणाले.

Nagpur MLC Election : बावनकुळेंच्या विजयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मी स्वत: निवडून आलो, तेव्हा…!”

नाना पटोलेंची एकाधिकारशाही

दरम्यान, यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचं म्हटलं आहे. “नाना पटोलेंची मनमानी आणि एकाधिकारशाही काँग्रेसमध्ये चालू आहे. त्याचं प्रत्यंतर या निवडणुकांमध्ये दिसतंय. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे हे पुन्हा दिसून आलंय. नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर स्थानिक काँग्रेसची नाराजी आहे. उमेदवारी बदलल्यानंतर त्या उमेदवाराने मुद्दा प्रतिष्ठेचा केला. नागपूरची बुद्धिजीवी वैचारिक भूमिका असणारे मतदार भाजपाच्या मागे उभे राहिले. नाना पटोलेंच्या एकाधिकारशाहीचा काँग्रेसच्याच लोकांनी पर्दाफाश केल्याचं दिसून आलं आहे”, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”, नागपूरमधील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा!

“आमच्या मतापेक्षा जास्त मतं पडली. काँग्रेसची मतं फुटली. हे सरकार पूर्णपणे वसुली सरकार आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेलं सरकार आहे. अशा वेळी जनतेनं रोष दाखवून दिला की तुम्ही काम करण्याच्या योग्यतेचे नाही”, असंही ते म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; नागपूर, अकोल्यात भाजपानं मारली बाजी!

“मुख्यमंत्रीपद असताना पक्षाचा आमदार पडतो”

“मुख्यमंत्र्यांनी पक्षात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्रीपद असताना गावापासून वरपर्यंत ज्या निवडणुका होत आहेत तिथे शिवसेनेची अधोगती होताना दिसत आहे. अशा वेळी पक्षाचा अकोल्याचा आमदार पडतो, यावरून शिवसेनेचा काऊंटडाऊन कसा होतोय, हे अधोरेखित झालं आहे”, अशा शब्दात प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

दरम्यान प्रविण दरेकर यांच्याप्रमाणेच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील या विजयावरून महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.