शत-प्रतिशत भाजपा या नीतीने सध्या पक्षाची मोच्रेबांधणी सुरू असल्याचे इस्लामपूरच्या शेतकरी मेळाव्यावरून स्पष्ट दिसत असले तरी घटक पक्ष मोडून ही बांधणी केल्याचे ते अंगलट येणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे. इस्लामपूरच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका टाळत असताना स्वाभिमानीतील संभाव्य दुफळीला खतपाणी घालण्याचे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ‘दिल्या घरी सुखी सध्या तर सुखी राहा’ असाच संदेश या मेळाव्यात भाजपाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली जिल्ह्य़ात भाजपने पद्धतशीरपणे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील गडांना सुरुंग लावण्यात आला. हे करताना राष्ट्रवादीतील शिलेदारांची मदत घेण्यात आली. रयत विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बाजी मारत असताना काँग्रेस, रिपाई, स्वाभिमानीचे शिलेदार सोबतीला घेऊन अगोदर त्यांचे पूर्वाश्रमीचे दोर कापण्याचे काम केले. एकदा दोर कापल्यानंतर परतीचे मार्ग बंद होतात. हे लक्षात आल्यावर भाजपाशिवाय पर्याय उरलेला नाही याची जाणीव करीत सत्तेचे पंचपक्वन्नाचे ताट समोर ठेवल्यानंतर कार्यकत्रे आपसूकच भाजपाच्या तंबूत दाखल होतात. याच धोरणानुसार इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपात प्रवेश दिला गेला. मात्र यामुळे इस्लामपूरच्या राष्ट्रवादीला िखडार पडले असे म्हणणे सध्या तरी धाडसाचेच वाटते.

नगरपालिकेच्या सत्ताकारणात अपक्ष असलेले नगरसेवक दादासाहेब पाटील यांना राष्ट्रवादीने आपल्याकडे घेत उपनगराध्यक्ष करीत बहुमत आपणाकडे असल्याचे कागदोपत्री तरी दाखवून दिले आहे. यामुळे सध्या तरी इस्लामपूरचा राजकीय नकाशा सध्या तरी बदलण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. मात्र आष्टय़ाच्या राजकारणावर िशदे घराण्याचा असलेला वरचष्मा पाहता वैभव िशदे यांच्या भाजपा प्रवेशाने दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वाळवा मतदार संघात िशदे घराण्याचे मतदान दुर्लक्ष करण्यासारखे नसल्याने याची दखल आ. पाटील यांना घ्यावीच लागणार आहे. बागणी जिल्हा परिषद गटात जे पेरले तेच आता फळाला आले आहे.

िशदे घराण्याची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही हे ओळखून आ. पाटील यांनी आतापासूनच मोच्रेबांधणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेली दुफळी लाभदायी करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या माध्यमातून खा. राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेला आíथक मदत देण्यात आली. यातून द्यायचा तो संदेश शेट्टीपर्यंत पोहच करण्यात आला आहे. जर खोत समर्थकांकडून अडवाअडवी झालीच तर कुमक देण्याची तयारी आहे असाच संदेश दिला गेल्याचे मानले जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात निर्माण झालेले मतभेद सध्या तरी टोकाचेच आहेत. दोघांची दिशा वेगवेगळी झाल्याचे स्पष्ट दिसत असतानाही खोत संघटनेतून बाहेर का पडत नाहीत, अथवा शेट्टी यांच्याकडून कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र खोत यांच्यावर कारवाई केली तर अन्याय केला असे सांगत खोतांना हौतात्म्य लाभेल अशा विचाराने कारवाई टाळली जात आहे. खोत यांना अथवा त्यांचा मुलगा सागर याला भाजपामध्ये घेण्याची घाई करण्यास कोणतेच कारण सध्या भाजपाकडे नाही. लगेचच निवडणुका नाहीत, अथवा कोणते वेगळे पद द्यायचे आहे असेही नाही. यामुळे आहे तिथे राहून संघटनेची बांधणी स्वाभिमानीच्या व्यासपीठावरून करत राहा असाच सल्ला भाजपाकडून राज्यमंत्री खोत यांना दिला गेला आहे. सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर, बीड, सातारा आदी जिल्’ाात खोत यांना जवळून ओळखणारे मतदार आहेत ते तसेच राहून ऐन निवडणुकीत भाजपाच्या मदतीला आले तरच लाभदायी ठरणार आहे. यामुळेच भाजपाने राज्यमंत्री खोत यांना दिल्या घरी सुखी राहा असे सांगत भाजपा प्रवेशाबाबत सबुरीचे धोरण घेण्याचा सल्ला दिला.

स्वाभिमानीचे नेते शेट्टी हे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आक्रमक झाले आहेत. यानिमित्ताने त्यांनी केंद्र व राज्य शासनावर आक्रमक टीका करीत असताना भाजपाने फसविले असल्याचे जाहीरपणे सांगण्यास प्रारंभ केला आहे.

नेमकी हीच बाब भाजपाला डाचत असून मित्रांकडून होत असलेली टीका परतवण्यापेक्षा व्यूहरचनेत अडकविण्याची खेळी भाजपाकडून केली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पर्याय शोधण्याचे कामही भाजपाने सुरू केले आहे. यासाठी लागणारा दारूगोळा, कुमक वारणेचे विनय कोरे, शिरोळचे उल्हास पाटील यांच्याकडून तजवीज केली जात आहे. शिराळा, इचलकरंजी, हे तर भाजपाचे प्रांत ठरले आहेत. यामुळे या ठिकाणीही कमळाचाच खासदार अशी स्वप्ने भाजपकडून रंगविली जात आहेत.