शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, अशा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. दरम्यान, राऊतांच्या आरोपाला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : “शिवजयंती केवळ हार घालण्यापुरती मर्यादीत ठेऊ नका, तर…”; राज ठाकरेंचा VJTI महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

काय म्हणाले केशव उपाध्ये?

खासदार संजय राऊतांच्या आरोपावर बोलताना, “संजय राऊत किती घसरणार? गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली आहे. एक आरोप ठोस सिद्ध करू शकले नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो, म्हणून इतकही हसू करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देशात आजही ‘पेगासस’चा वापर सुरू”; संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “देशातील प्रमुख उद्योगपती…”

संजय राऊतांनी नेमके काय आरोप केले?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. “माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत दोन हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असे ते म्हणाले होते. तसेच याबाबत लवकरच पुरावे देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp replied to sanjay raut allegation of deal for bow n arrow sign spb