‘२०२४ मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय,’ असा प्रश्न विचारत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली होती. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एखमुखी घेतले. यानंतर ‘तुम्हाला जो कोणी मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा,’ असा सूचक इशारा बावनकुळेंनी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. “अहो बावनकुळे साहेब… देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पहिलं आमदार व्हावं लागेलं. तुमच्याच पक्षाचे लोक नागपूर मध्ये निवडणुकीची वाट पाहत आहेत,” अशी पोस्ट अनिल देशमुखांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर केली होती.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “असं असेल तर…”

आता अनिल देशमुखांना भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपानं ‘एक्स’ अकाउंटवर लिहिलं की, “अहो वसुली साहेब… तुम्हाला जनतेसमोर मतं मागायला जातांना १०० कोटीचा हिशोब तर द्यावाच लागेल. पळ काढून कुठं पळता? तुम्हाला पळता पण येणार नाही माढा सारख. आणि हो तुमची वाट तुरुंगाच्या भिंती पण पाहत आहेत.”

हेही वाचा : “जयंत पाटील आमच्याच संपर्कात,” मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “शरद पवारांकडे कोणीही…”

नेमकं बावनकुळे काय म्हणाले होते?

भाजपाच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत आहेत. मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर बावनकुळेंनी संवाद साधला. यावेळी ‘२०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवाय?’ असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव कार्यकर्त्यांनी एकमुखी घेतले. या मागणीनंतर बावनकुळे यांनी ‘मग लागा कामाला’ असा सूचक इशारा कार्यकर्त्यांना दिला.