महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरत आहे. त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली होती. याला भाजपानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, हे वरचेवर सिद्ध झालं. पण, संवेदनाही नाहीत, हेही दाखवून दिलं, असं टीकास्र भाजपानं एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवरून सोडलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“मुख्यमंत्री दिल्लीवाल्यांची मन की बात ऐकायला येतात. पण, नांदेड, नागपूर, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत मृत्यूचं तांडव सुरू आहे. त्याचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनाही हा आक्रोश ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरत आहे. त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता.

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Bhimrao Dhonde On Vidhan Sabha Election 2024
Bhimrao Dhonde : भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे चक्क स्वतःचं चिन्ह विसरले; भर सभेत म्हणाले ‘तुतारी’ वाजवा; नेमकं काय घडलं?

“राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे…”

यावर भाजपानं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं, “महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, असे संजय राऊत आज म्हणाले. संजय राऊत तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले. कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का? तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा.”

हेही वाचा : “शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात फरक हाच की…”, जयंत पाटलांचं विधान

“…आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा”

“सुमंत आठवला की त्याचा अकाली मृत्यू आठवा, त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही वाऱ्यावर सोडलेले त्याचे कुटुंब आठवा…त्यांची पत्नी कीर्ती काय म्हणाली तेही आठवा. सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा… आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा,” असा हल्लाबोल भाजपानं संजय राऊतांवर केला आहे.

“पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यु झाला अन्…”

“तुमचे मालक उद्धव ठाकरे यांची मणक्याची शस्त्रक्रिया नीट होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, मी बीड ते तिरूपती पायी चालत दर्शनाला येईन असे साकडे बालाजीला सुमंत रुईकरने घातले होते. उध्दव ठाकरे ठणठणीत झाल्यावर आपले वचन पूर्ण करण्यासाठी बीडहून ११०० किमी पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यु झाला. आणि त्यानंतर तुम्ही आणि तुमचे मालक सुमंतला विसरले,” असं भाजपानं सांगितलं.

हेही वाचा : “फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार अन् उद्धव ठाकरे…”, भाजपाचा हल्लाबोल

“कशाला यमाचे नाव काढता?”

“लक्षात आले का राऊत रेडा कोण घेऊन फिरतं आहे? पक्ष नावाचं कुटुंब वाऱ्यावर सोडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी…’ इतकेच तुम्हाला आणि तुमच्या मालकाला ठावूक आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे कर्तुत्व तुम्ही विरसलेच आहात. या पंधरवड्यात त्यांचे स्मरण करा. कशाला यमाचे नाव काढता?” अशा शब्दांत भाजपानं संजय राऊतांना सुनावलं आहे.