पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं होतं. याला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.
“कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपा जिंकली की ईव्हीएमवर शंका घेतली जाते. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?” असा टोला भाजपानं लगावला आहे.
हेही वाचा : “…तेव्हा कारवाई करू नका”, अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
भाजपा महाराष्ट्रानं ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत म्हटलं, “उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन बसला, त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.”
“राम मंदिराच्या मुद्द्यांवर ‘मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे’ अशी टीका तुम्हीच केली होती. पण, आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे,” अशी टीका भाजपानं उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा : “…तर उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा; म्हणाले, “आमच्यावर कारवाई…”
“कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपा जिंकली की ईव्हीएमवर शंका घेतली जाते. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?” टोमणा भाजपानं लगावला आहे.