पाच राज्यांच्या निवडणूक निकालापूर्वीच विरोधक इंधनाचे दर वाढणार असल्याची टीका करत होते. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर झालंही तसंच इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे. इंधनाचे दर वाढल्याने भाजपाची कोंडी करण्याची रणनिती सुरु केली आहे. विरोधकांकडून मोदी सरकारचे हेच का अच्छे दिन अशी टीका केली जात आहे. सध्याची स्थिती पाहता यापेक्षा बुरे दिन असू शकत नाही असा निशाणा काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी शून्य प्रहारात लोकसभेत साधला. तर शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता भाजपाने शिवसेनेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना भाजपाशासित राज्यातील पेट्रोल दराची आकडेवारी जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेनं आज मुंबईत पेट्रोलचा दर ११५.४ रुपये प्रति लिटर असल्याचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरला भाजपा महाराष्ट्राने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पोस्टर शेअर करत भाजपाशासित राज्यातील आकडेवारी जाहीर केली आणि ठाकरे सरकारला जाब देखील विचारला आहे. “जिथे भाजपचे सरकार नाही, तिथे पेट्रोलचे दर ११५ रुपयांपेक्षा जास्त आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलच्या दरात कमी केली नाही.”, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप शासित राज्यपेट्रोलचे दर (प्रति लिटर)
गुजरात ९९.२० रुपये
उत्तर प्रदेश १००.०६ रुपये
कर्नाटक१००.१४ रुपये
गोवा१००.४२ रुपये

इंधन दरवाढीवरून भाजपा विरोधी पक्ष एकवटले आहेत. तर भाजपाही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. इंधन दरवाढीवरून येत्या काही दिवसात राजकारण जोरदार तापणार असल्याचं यावरून दिसत आहे.