नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ, तसेच भाजप, रा. स्व. संघ हटाव-लोकशाही बचावह्णची मागणी करत विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी नगरमध्ये सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी दंडाला काळय़ा फिती बांधून मोदी सरकारचा निषेध केला.

जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, सैनिक समाज पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, तसेच नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी बोलताना प्रमुख वक्त्यांनी राहुल गांधींचा संसदेतील आवाज दाबण्यासाठी भाजपने कारवाई केली, असा आरोप करण्यात आला.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Five former corporators of Thackeray group join BJP flexes against them started in Pune
ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होताच त्यांच्या विरोधात पुण्यात लागले फ्लेक्स
Public interest litigation against Sant Kabirnagar slum in nashik
संत कबीरनगर झोपडपट्टीविरोधात जनहित याचिका

विविध पक्षांचे पदाधिकारी किरण काळे, शशिकांत गाडे, संजय झिंजे, संभाजी कदम, प्रताप शेळके, रोहिदास कर्डिले, संपत म्हस्के, अरुण म्हस्के, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, उद्धव दुसुंगे, शरद झोडगे, प्रकाश पोटे, केशव बेरड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, अर्षद शेख, शाकीर शेख, रवी सातपुते, शिवाजी साळवे, अ‍ॅड. शिवाजी डमाळे, डॉ. श्रीधर दरेकर, सुजित क्षेत्रे, अ‍ॅड. मंगेश काळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले.

शहर राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची चर्चा

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरी नगर शहरात आज झालेल्या भाजपविरोधातील विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनात नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी सहभागी झाले नव्हते. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला आंदोलनाच्या पूर्वनियोजन बैठकीचा निरोपही दिला गेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुक्यातील पदाधिकारी सहभागी होते. मात्र नगर शहरातील राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची चर्चा होत होती.

Story img Loader