भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. महिला व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं पाहून देशमुख यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा व्हिडीओ बंद झाला आहे.

संबंधित व्हिडीओत महिलेनं “हा श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलंय. बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय, लग्न करतोय हा” असं म्हटलं आहे. यानंतर संबंधित खोलीत उपस्थित असणाऱ्या श्रीकांत देशमुख यांनी महिलेच्या हातातून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांत झटापट झाल्याचं देखील व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे.

viral video of vardha
VIDEO : आधी कानाखाली मारली अन् खाली पाडून…; राज्यात दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण, कारण काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Walmik Karad and Anjali Damania
Anjali Damania : “वाल्मिक कराड ठणठणीत आहेत”, अंजली दमानियांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाल्या…
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
mahakumbha mela sadhu video fact check
महाकुंभ मेळ्यात साधूचा अपमान! कुस्तीच्या आखाड्यात उतरवून केली मारहाण; VIRAL VIDEO मधील बॅनरवरून सत्य झालं उघड
Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल

हेही वाचा- “…म्हणून गद्दारी झाली”; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले…

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला असून सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली होती. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Story img Loader