माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख नागपूरचा कलंक असा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. मात्र हा वाद काही शमताना दिसत नाहीये कारण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अख्खी एक कविता सादर करत कलंक कसा ओळखावा? हे वर्णन केलं आहे. उद्धव ठाकरेंना उद्देशूनच ही कविता त्यांनी पोस्ट केली आहे.

काय आहे केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेली कविता?

पडवळ बाहूचे पसरुनी पंख
दूध पाजणारासि घेतो डंख॥
उच्च कोटीचा मानसिक रंक
तो येक वोळखावा कलंक॥

Devendra Fadnavis on Eknath Khadse
Devendra Fadnavis: ‘फडणवीसांनी मुलीची शपथ घेतली होती’, खडसेंच्या त्या गौप्यस्फोटवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्रीय नेतृत्वाने…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Ajit Pawar, RSS Memorial, Ajit Pawar Avoids RSS Founder s Memorial, Hedgewar Smruti Mandir BJP, Nagpur, Deekshabhoomi,
अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?
Devendra Fadnavis on Narayan Rane Malvan Statue collapse
Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”

कुटुंबाची करितो धन
साधा देह सडके मन॥
कर्तृत्व जया अंगी निरंक
तो येक वोळखावा कलंक॥

पूर्वायुष्यी बहु केला राडा
घरी बैसोनि हाकला गाडा॥
सत्ता गमावुनि झाला खंक
तो येक वोळखावा कलंक॥

कलंकाचे कैसे बोलणे
कलंकाचे कैसे चालणे॥
दिसणे हसणे जयाचे
कलंकचि असे॥

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कविताच ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.