प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर काल पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. मागील काही दिवसांपासून आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू आहेत, असे म्हटले जात आहे. असे असतानाच हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतूक केले आणि यासोबत युतीचे संकेतही दिले. उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर आज भाजपाने टीका केली आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे असं म्हणाले, की लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं. प्रकाश आंबेडकरांच्या सोबत त्यांचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात ते बोलत होते. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केलेला हा सर्वात मोठा विनोद आहे, असं आमचं मत आहे. कारण, लोकाशाहीची चिंता त्यांना नसून उरलासुरला पक्ष जो काही राहिला आहे तो वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्याला लोकशाही वाचवण्यासाठीच काहीतरी लेबल लावत आहेत.”
याशिवाय “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय स्वत:च्या कर्तृत्वावर ज्यांना काहीच करता येत नाही, त्यांनी लोकशाही वाचवण्याचा गप्पा मारणं हा एक मोठा विनोद आहे. उरला सुरला जो काही पक्ष आहे तो वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे.” अशीही उपाध्ये यांनी टीका केली.
याचबरोबर “वैचारिक विरोधावर ज्यांचा विश्वास नाही आणि एकप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा संभाजी ब्रिगेडसोबतही यांनी युती केली. नक्षलवाद्यांचं जे समर्थन करताय त्यांच्या सोबत ते जाताय. हिंदुत्व आणि या देशाची अस्मिता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसमोर उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकले आणि सत्तेसाठी राष्ट्रवादीसमोर स्वाभीमान सोडून दिला. ते ठाकरे आता लोकशाही वाचवण्याचा गप्पा मारता आहेत. हीतर उरलासुरला पक्ष वाचवण्यासाठीची त्यांची धडपड आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्वत:च्या पक्षात तरी लोकशाही आहे का याचा विचार त्यांनी हे विधान करताना करायला हवा होता.” असंदेखील केशव उपाध्येंनी म्हटलं.