हेही वाचा – “ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र”; गोपीचंद पडळकरांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Chandrakant Patil Statement On OBC Reservation : पावसामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यास त्याचा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना एक निवेदन दिले. यावेळी राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. अशात राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपाची भूमिका आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होत असल्याने आणि राज्यातली पावसाची स्थिती बघता, या निवडणुका पुढे ढकण्यात आल्या तर याचा फायदा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी होईल. त्यासाठी थोडी सवड मिळेल, असा आमचा विश्वास आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ”राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी अचानक ९२ नगरपालिका ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम असेल. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे. त्यामुळे आयोगाने हा निवडणुता पुढे ढकलाव्या,”

दरम्यान, राज्यात १८ ऑगस्ट रोजी १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली होती. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा – आडनावावरून जात गृहीत धरणे चुकीचे; ओबीसींबाबत पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र