बारामती लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाविजय २०२४ मावळ लोकसभा, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा अंतर्गत त्यांची आज पिंपरी- चिंचवडमध्ये बैठक झाली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती लोकसभा शंभर टक्के भरघोस मतांनी विजयी होणारा असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मावळमधील जागेचा तिढा याविषयी आम्हाला चिंता नाही. आम्हाला केवळ नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायच आहे. त्यामुळे आम्ही काळजी करणार नाहीत उमेदवार कोण आहे ते बघणार नाहीत. महायुती म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहोत. महाराष्ट्रात भाजपाच्या २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभेत आम्हाला उमेदवार निवडून आणायचे आहे. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.