पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना भाजपा सरकराने हा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय राजकीयदृष्टीने प्रेरित असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या निर्णयावर टीका करताना निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट “निवडणूक जुमला” वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. “जुमला “शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची”, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची भेट; घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, सुप्रिया सुळेंची मात्र टीका

ते पुढे म्हणाले, “अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता. मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते… इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर २०० रुपयांची कपात केली होती… आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती. आठवा जरा!”

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रमाणेच भाजपा महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवरूनही सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “एकर भर शेतीत करोडो रुपयांची तथाकथित वांगी पिकविणाऱ्या सुप्रिया सुळे यांना सामान्य महिलांच्या भावना कशा समजणार”, अशी टीका पोस्टद्वारे करण्यात आली आहे.

“संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी…”, नितीन गडकरींच्या विधानाबाबत भाजपाची पहिली प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,”भाजपलाही एक पाय मागे घ्यावा लागू शकतो”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी मात्र टीका केली आहे. मोदी सरकार मागच्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. मग सिलिंडरच्या दरात कपात करण्यासाठी आजचाच मुहूर्त का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अवघ्या काही दिवसांवर आता लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक ‘जुमला’ आहे. हा एक राजकीय निर्णय असून त्यात महिलांना दिलासा देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही. आमच्या काळात गॅस सिलिंडर ४३० रुपयांना मिळत होता. महिलांवरील आर्थिक भार कमी करायचा असेल तर सिलिंडरचे अर्ध्यावर आणायला हवेत.