मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जूनला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेतून विरोधकांना उत्तर देणार आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचीही सभा पार पडली असल्याने यानिमित्तानेही निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपाने या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाकडून नेहमीच शरद पवारांच्या हातात सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याची टीका केली जात असते. पडद्यामागून शऱद पवारच सरकार चालवतात असा दावा नेहमीच विरोधकांकडून केला जात असतो. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पुन्हा एकदा टीका केली आहे.

भाजपाने ट्विटरला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर “हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे” अशी बातमी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून त्यावर ते होय साहेब असं उत्तर देत असताना दाखवलं आहे.

या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा असते असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपा वेगवेगळे व्यंगचित्र बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत अशी टीका केली आहे. “वास्तविक शिवसेना वेगळा पक्ष आहे त्याची वेगळी विचारसरणी आहे. २०१९ मध्ये किमान-समान कार्यक्रमाच्या आधारावर आम्ही एकत्र आलो. महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्विकारलं. यामुळे महाराष्ट्र पुनश्च प्रगतीपथावर आलं आणि म्हणूनच भाजपाच्या पोटात दुखत असल्याने वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत”, असं ते म्हणाले आहेत.

“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू. २०२४ मध्ये महाविकास आघाडी परत एकदा निवडून येईल. भाजपाचं सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्णपणे भंग झालेलं आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.