रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे सध्या संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. रशियाच्या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युद्ध पेटले! ४० सैनिकांसह ५० ठार; रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी युद्धाचा निषेध केला. तसंच दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणं केंद्राची जबाबदारी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “युद्धाचा परिणाम फक्त भारतच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे”.

VIDEO: मुलीला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मागे लढण्यासाठी थांबलेल्या पित्याला अश्रू अनावर; गळ्यात पडून ढसाढसा रडला

अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मी प्रयत्नशील आहेच. पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत त्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी संपूर्ण पणाला लावले पाहिजे”.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न बोललेलं बरं”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे हे २६ तारखेला उपोषणास बसणार असून मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेलं बरं असं सांगत उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “सगळीकडे राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली,” असं उदयनराजे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधातील कारवाईवर भाष्य

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईसंबंधी बोलताना सांगितलं की, “हे कर्म आहे, याच जन्मात परतफेड करावी लागते. याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर तथ्य नसतं तर ते झालं नसतं”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “अनेक गोष्टी मी उघडपणे बोललो असून राजकारण म्हणून बोललो नाहीत. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. आज लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मीयता असायला हवी पण ती आता कमी होत चालली आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp udyanraje bhosale on russia ukrain war central government sgy