सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या चित्रपटातील गाणी आणि स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. चित्रपटातील गाण्यांवर अनेकजण रिल्स तयार करत असून त्याचे मिम्सही बनवले जात आहेत. दरम्यान बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाची भुरळ साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही पडली आहे.

आपल्या डायलॉगाबाजी तसंच स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे रविवारी साताऱ्यात पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ नेसून पोहोचले होते. यावेळी त्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला. प्रसारमाध्यमांनी त्यांना लुंगी नेसण्याचं विशेष कारण विचारलं असता, मोकळं वाटतंय, छान वाटतंय असं उत्तर दिलं. उदयनराजेंसोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही लुंगी नेसली होती.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

सेल्फी काढल्यानंतर उदयनराजे आपल्या कारमध्ये जाऊन बसले तेव्हा गाडीत ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणं सुरू होतं. या गाण्यावरही उदयनराजे फिदा असल्याचं दिसत होतं. मग काय नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये फ्लाईंग किस देत उदयनराजेंनी कॉलर उडवली.

‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. सुकुमार यांनी याच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदी भाषांमध्ये हा चित्रप प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

Story img Loader