सावंतवाडी : दिपक केसरकर यांच्या धमक्यांना घाबरत नाही. गेली १५ वर्षे आमदार व ८ वर्षे मंत्री असूनही सावंतवाडी मतदारसंघाचा विकास झाला नाही, केसरकर यांनी मतदारसंघ व भाजपवर सतत अन्याय केला आहे. त्यामुळे आमदार बदलला पाहिजे. आमचं ठरलंय, विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायचं, भाजपने मैत्रीपूर्ण लढत द्यावी, अन्यथा तुम्हाला विचारून मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भूमिका घेतली जाईल असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख, माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात समन्वयक माजी आमदार राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, एकनाथ नाडकर्णी, तालुका मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, वेंगुर्ले अध्यक्ष सुहास गवंडळकर, शितल राऊळ, पंकज पेडणेकर, आदी उपस्थित होते.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान

तेली म्हणाले, दीपक केसरकर सुरुवातीला पालकमंत्री होते तेव्हापासून त्यांनी वारंवार भाजपवर अन्याय केला आहे. भाजप पक्षाच्या बांधणीसाठी मी पक्षाचा बळी ठरलो. आम्ही निधी आणतोय, केसरकर नारळ फोडताहेत. आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर भाजपने लोकांना न्याय दिला. केसरकर फक्त मी केलं म्हणतात, आम्ही कधी म्हणणार? ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाला शेतकऱ्यांनी जागा दिली. ते ३२ वर्षे झगडताना पाहिले. भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा. पर्यटनमंत्री गिरीश महाजन स्वतः बोलले. केसरकर यांचा पळपुटेपणा लोकांनी पाहिला. केसरकर स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत. निवडणूक तोंडावर असताना घोषणा करत दिखाऊपणा दाखवत आहेत. मी दिपक केसरकर यांचे काम करणार नाही.

हेही वाचा – दर दिवाळीत होणारी एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळाकडून प्रवाशांना दिलासा

केसरकर यांना उद्देशून राजन तेली म्हणाले, मला संघर्ष करायची सवय आहे. मला अशा धमक्या देऊ नका. भाजपचे वरिष्ठ धमक्या देऊ शकतात. केसरकर यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपला न्याय मिळवून देण्यासाठी केसरकर यांच्या विरोधात लढत राहणार आहे. माझ्याबरोबर जे असतील त्यांना सोबत घेऊन जाईन. पक्ष सोडण्याचा निर्णय कोणाला घ्यायला सांगणार नाही. आपणाला निवडणूक लढवून जिंकायची आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार आहे. केसरकर यांच्या राजकारणाचा स्पर्धापाश करेन.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : “बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार, एकालाही..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, रवींद्र मडगावकर, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, दादू कविटकर, उपसरपंच हेमंत मराठे, आदींनी बोलताना सावंतवाडी मतदारसंघात भाजपावर केसरकर अन्याय करत आहेत. त्यामुळे मतदारसंघ भाजपला मिळावा आणि उमेदवार राजन तेली असावेत, अशी भूमिका मांडली, तसेच केसरकर यांनी दिलेल्या त्रासाचा लेखाजोखा मांडला.