Pune Bypoll Uddhav Thackeray Speech : भाजपाने आत्तापर्यंत वापरा आणि फेकून द्या असंच धोरण अवलंबलं आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilka) यांच्या निधनानंतर भाजपाने टिळक कुटुंबीयांना वापरून फेकून दिलं. लोकमान्य टिळकांच्या वंशजांवर हा अन्याय करून भाजपा थांबली नाही. कसब्यातून भलत्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं. त्यांची अवस्था पाहून तर मला भाजपाचं क्रौर्य किती भयंकर आहे ते जाणवलं असं म्हणत कसबा पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाची पाशवी महत्त्वकांक्षा

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाइन पद्धतीने संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले, भाजपाला कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. भाजपाची पाशवी महत्त्वाकांक्षा आहे. त्यांची ही पाशवी पकड दूर फेकण्याची या पोटनिवडणुकीपासून सुरूवात करा असंही उद्धव ठाकरे मतदारांना उद्देशून म्हणाले.

निवडणूक बिनविरोध घेण्याचा मोकळेपणा लोकशाहीत उरलाय का?

काही जण म्हणतात की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. ही मागणी रास्त आहे कारण दोन्ही उमेदवारांचं आजारपणाने निधन झालं आहे. मात्र निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी जो मोकळेपणा होता लोकशाहीत तो आता उरला आहे का? दुर्दैवाने या दोन निवडणुका आल्या आहेत. ज्यांना वाटतं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत असेल तर मग कसब्यात लोकमान्य टिळकांचं घराणं वगळून उमेदवारी दिली गेली ती का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उमेदवारी बदलल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं. गिरीश बापट यांची अवस्था पाहून मला वाईट वाटलं. गिरीश बापट यांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. सर्वात क्रौर्याचा कळस म्हणजे गिरीश बापट गंभीर आजारी असताना प्रचाराला उतरवता हा कुठला अमानुषपणा आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना साथ देणार का?

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आणि आताही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार का असा प्रश्न केला जात आहे. आम्ही या आधी २५ वर्षे भाजपाला मतदान करतच होतो असे सांगत भाजपकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तुमचा वापर करून पाशवी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. आमच्यासोबत आलात तर तुम्ही चांगले आणि आमच्या विरोधात गेलात तर तुरुंगात जाल हे भाजपचे धोरण आहे. आमच्याविरोधात गेलात तर चौकशी आणि भाजपासोबत आले तर स्वच्छ कारभार असा ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.