सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. दोघांनी पंधरा मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. ही भेट राजकीय नव्हती, तर वैयक्तिक स्नेहामधून होती, असा खुलासा दोन्ही नेत्यांनी केला असला, तरी या भेटीनंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपचे नेते तावडे यांनी काल व आज जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव आणि मिरज या चार विधानसभा मतदारसंघांतील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिराळा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे आणि नाईक यांची बंद दाराआड काही काळ चर्चा झाली. मात्र, या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे उभयतांनी सांगितले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…

हेही वाचा >>>‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवारी

दरम्यान, जिल्ह्यात या वेळी जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळाल्या पाहिजेत असे आवाहन करत तावडे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराचा कानमंत्र दिला. त्यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, राहुल महाडिक आदी उपस्थित होते.

दरम्यान बुधवारी सायंकाळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगावमध्येही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर गुरुवारी सकाळी मिरजेत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला नाही.