भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अभ्यास नसलेला छोटा नेता असं म्हटलं होतं. त्यावरून त्यांच्यवर जोरदार टीका झाली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते साऱ्या जनतेचे लोकनेते आहेत असे मत राष्ट्रवादीच्या अनेत नेत्यांनी मांडले. त्यानंतर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना पचनी पडली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर तोफ डागत त्यांची तुलना थेट आश्रम वेब सिरीजमधील भुपाशी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“ठाण्यातील शिवसेनेच्या सगळ्याच आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले”

अमोल मिटकरी यांचे उत्तर

“इकडे ४ खासदार ३०३ ला भारी, जसे ५६/५५/४४ (१०५) ला भारी! बारामतीत डिपॉझिट का जप्त झालं? यावर भाष्य केलं असतं तर समजू शकलो असतो. पण प्रसिद्धी पिसाटांना थोडं चर्चेत राहायला अधूनमधून मानसिक झटके येतात. ‘आश्रम’मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टीका करणारा (भा) जपनामवाला गोपा सारखेच. ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहून साहेबांवर बोलावं. राहिला मोदींचा प्रश्न तर त्यांना विचारा तुमचा गुरु व मार्गदर्शक कोण?”, असं रोखठोक उत्तर अमोल मिटकरी यांनी पडळकरांना दिलं.

“ईडी’च्या धाडी टाकून सरकार बनवता येईल असं मानणारे मूर्ख”

काय म्हणाले होते पडळकर?

“काहींना लोकनेते म्हटलं जातंय. ज्या पक्षाचे केवळ ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेते कसे काय म्हणलं जाते? आणि असं असेल तर मग ३०३ खासदार निवडून आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं? तुम्ही तर मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा कशासाठी?” असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केलं होतं.