देशात कॉंग्रेसविरोधी लाट असून, चार राज्यातील निवडणुक निकालांनी हे सत्य अधोरेखित केले आहे. राज्यातील जनताही सरकारच्या कारभाराला कंटाळली असून महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. चार राज्यांतील विधानसभांचे  निकाल हा कॉंग्रेस सरकारच्या कारभाराविरोधातील कौल असून २०१४ साली राज्यातही परिवर्तन झालेले दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशात असलेली नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात केलेल्या विकासकामांमुळेच आजचे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपची ही घौडदौड पहायला मिळेल, असंही फडणवीस पुढे म्हणाले. नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून आजच्या निकालांवरही त्याचा मोठा परिणाम होणार असे दिसते. विशेषत: भाजपला मिळालेला विजय पाहता, या अधिवेशनात ते अधिक आक्रमक झालेले दिसतील.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा