सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाहीत. त्यानंतर भाजप ढेकर देईल असे उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितले.
सांगली दौर्यावर आलेल्या खा. राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान पदाचा निर्णय इंडिया आघाडीत एकत्र बसून घेतला जाईल. उध्दव ठाकरे पंतप्रधान का असू नयेत असा सवाल करून ते म्हणाले, जर ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह सर्व घटक पक्षाचे नेते निश्चितपणे त्यांना पाठिंबा देतील. पंतप्रधान पदाचा मान महाराष्ट्राला का मिळू नये? आम्ही शरद पवार यांना ही संधी मिळेल याची वाट पाहत होतो. मात्र, अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राला ही संधी मिळू शकली नाही असेही ते म्हणाले.
हेही वाचा…सोलापूर: भाजप उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनात चोरट्यांची ‘हाथ की सफाई’
उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबाबत केलेले खुलासे खरे असून नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ निवडून येऊ शकत नसल्यानेच उमेदवारी बदलण्यात आली असेही खासदार राऊत म्हणाले.