केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या वादग्रस्त विधानामुळे काल दिवसभर गोंधळ निर्माण झालेला होता. भाजपा-शिवसेना आमनेसामने आले होते. तर, नारायण राणे यांना अटक झाल्याने, रात्री उशीरापर्यंत त्यांना महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर होईपर्यंत हा गोंधळ सुरू होता. मात्र नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटेकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतान ही माहिती दिली आहे. तसेच, काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा