समीर जावळे

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी झाले. बजरंग सोनावणेंनी ६ हजार ५५३ मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे ही लढत लक्षवेधी ठरली. पंकजा मुंडे यांना भाजपाने लोकसभेसाठी तिकिट दिलं होतं. मात्र त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडेंना तिकिट देण्यात आलं नव्हतं. तिकिट मिळाल्यापासूनच आपण नक्की निवडून येऊ असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला होता. मात्र त्यांचा पराभव झाला.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

२०१९ आणि त्यानंतर काय घडलं?

बीडमध्ये आमदारकीची निवडणूकही पंकजा मुंडे हरल्या होत्या. पंकजा मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंना तिकिट दिलं होतं. धनंजय मुंडे या निवडणुकीत निवडून आले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही झाले होते. हा पराभव पंकजा मुंडेंना चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र २०२३ मध्ये जेव्हा अजित पवार महायुतीत आले तेव्हा त्यांच्यासह आलेल्या ४१ आमदारांमध्ये धनंजय मुंडेंचाही समावेश होता. आत्ताच्या सरकारमध्येही धनंजय मुंडे आहेतच. तसंच महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्यापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातलं ताणलं गेलेलं बहीण भावाचं नातं हे आता पुन्हा रुळावर आलं आहे. धनंजय मुंडेंनीही लोकसभेला पंकजा मुंडेंचा व्यवस्थित प्रचार केला होता. तरीही त्यांना यश आलं नाही.

हे पण वाचा- Rohit Pawar on Pankaja Munde: पंकजा मुंडेंना राज्यसभेची खासदारकी? रोहित पवार काय म्हणाले?

पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनासाठी भाजपाची तयारी

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याची तयारी भाजपाने सुरु केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा मुंडे हरल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. या घटनेचा पंकजा मुंडेंनाही खूप त्रास झाला होता. तसंच त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं होतं आणि पराभवामुळे मी खचून जाणारी नाही तर मी लढणारी आहे आणि मला तुमचं बळ हवं आहे, तेव्हा जीव गमावू नका, आत्महत्या कुणीही करु नका असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांसाठी भाजपाच्या गोटातून आनंदाची बातमी आहे. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या दोन शक्यता काय आहेत आपण जाणून घेऊ.

शक्यता क्रमांक एक काय?

सुनेत्रा पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांनाही राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाईल. तसं घडलं तर पंकजा मुंडे आणि सुनेत्रा पवार राज्यसभेत एकत्र दिसतील. पंकजा मुंडे या जर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडल्या गेल्या तर त्यांच्या निराश कार्यकर्त्यांना नक्कीच आनंद होईल. पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या. तसंच बीडच्या पालकमंत्रीही होत्या. मागच्या दहा वर्षांपासून निडवणुकीत त्यांना यश हुलकावणी देतं आहे. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येईल अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे.

दुसरी शक्यता नेमकी काय?

भाजपाच्या सूत्रांनी अशीही माहिती दिली आहे की पंकजा मुंडेंना कदाचित विधान परिषदेवर पाठवलं जाईल. तसं घडलं आणि त्या विधान परिषदेच्या आमदार झाल्या तर त्यांना सरकारमध्ये मंत्रिपदही देण्यात येईल. पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं २०१४ मध्ये निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आधीपासून आलेल्या पंकजा मुंडे सक्रिय झाल्या. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे, ओबीसी समाजाचाही त्यांना पाठिंबा आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं गेलं आणि मंत्रिपद दिलं गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या प्रचारातही त्यांना उतरवलं जाईल. राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवून भाजपाने पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाची तयारी सुरु केल्याची माहिती मिळते आहे.

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन भाजपाला का करायचं आहे?

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाजात टोकाचा वाद झाल्याची चर्चा आहे. अशात ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी पंकजा मुंडेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. पंकजा मुंडे जर राज्यात मंत्री झाल्या तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगली मतं मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीत जो फटका भाजपाला बसला आहे त्यानंतर आता भाजपाचं राजकारण वेगळ्या पातळीवर सुरु झाल्याचं दिसून येतं आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार की विधानपरिषदेवर हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. मात्र पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनासाठी काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.