देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद द्यावे, सोलापूरच्या भाजप आमदाराची मागणी

भाजपने १३२ जागा जिंकल्या सोलापुरात या पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी फडणवीसला मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली.

BJP won 132 seats Solapur MLA Vijay Kumar Deshmukh demanded Fadnavis as CM
फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व अतिशय यशस्वीपणे केले होते. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्व यावे, अशी तमाम भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार देशमुख म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. विशेषतः भाजपने १३२ जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडवणीस यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात असताना सोलापुरात या पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपद मिळण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत फडवणीस यांच्या नेतृत्वामुळे भाजपसह महायुतीला २३६ जागा जिंकता आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांना दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा…सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीबरोबर राहणार, अदृश्य शक्ती’ने मदत केल्याचा दावा

भाजपसह महायुती सरकारचा कारभार उत्तमप्रकारे होण्यासाठी आणि महाराष्ट्राला नवे आयाम देण्यासाठी फडवणीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. म्हणूनच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी. यापूर्वी त्यांनी राज्याचे नेतृत्व अतिशय यशस्वीपणे केले होते. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्व यावे, अशी तमाम भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp won 132 seats solapur mla vijay kumar deshmukh demanded fadnavis as cm sud 02

First published on: 25-11-2024 at 07:55 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा