नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपा पदाधिकाऱ्याकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. ‘हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर येथील उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुकी केली. तसेच, पोलिसांच्या कॉलरला हात घातल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? बावनकुळे म्हणाले…

‘एक्स’ अकाउंटवर संजय राऊत म्हणाले, ” हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट, नागपूर. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता.”

हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा राहुल नार्वेकरांना थेट सवाल; “न्यायाधीशांच्या भूमिकेतून…”

याच प्रकरणार शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी पुष्कर पोशेट्टीव पोलीस उपायुक्तांच्या अंगावर गेले आहेत. ही बातमी दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. गृहमंत्र्यांच्या घरासमोरच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून ही गुंडगिरी होत असेल, तर सर्व सामान्य नागरिकांवर काय अत्याचार करण्यात येत असतील, याचं उदाहरण म्हणजे ही घटना आहे,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. दरम्यान, धक्काबुक्कीचं कारण अद्याप समोर आलं नाही आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp worker beat police front devendra fadnavis nagpur house devgiri sanjay raut share video ssa
Show comments