राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मध्य प्रदेशच्या लाडली बेहेन योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. याची घोषणा आज अजित पवारांनी सभागृहात केली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. तसंच, यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे.

सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले, “भाजपाचा लाडक्या भावाने लाडकी बहिण योजना आणली आहे. पण गेले चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण, त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलं आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रिकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत. म्हणजे मूल्यमापन न करता, सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणला आहे. आता जे काय करायचं आहे ते ती समिती करेल, असं उत्तर द्यायला हे मोकळे होतील.”

jayant patil on maharashtra budget
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Need of faith and sanskar to prevent addiction in youth says mohan bhagwat
तरूणांतील व्यसनाधीनता रोखण्यासाठी श्रध्दा व संस्काराची गरज, सरसंघचालकांचे सोलापुरात सिध्देश्वर दर्शन
domestic gas News
Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?
devendra fadnavis nana patole in assembly session
“पुण्यासारख्या शहरावर असा कलंक लागणं…”, नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केला ‘हा’ मुद्दा; फडणवीस म्हणाले, “राजकीय दबाव…”!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
ajit pawar on jayant patil
राज्यातील सिंचन प्रकल्पांवरून अजित पवारांची जयंत पाटलांना कोपरखळी; म्हणाले, “आपल्या वेळी प्रकरण…”

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा

“महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल.” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Budget 2024-2025: अजित पवारांनी केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, कोण ठरणार पात्र? किती मिळणार निधी?

महिलांसाठी अर्थसंकल्पात काय काय तरतूद?

मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात येणार ही घोषणा करण्यात आली. स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलिंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.

महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे

राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.
महिलांना बस प्रवासात सवलत.
महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत.
वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.
बचत गटाच्या निधीत १५ हजारांवरुन ३० हजार निधी
यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार.

अजित पवारांची शेरो-शायरीही चर्चेत

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करुन देता यावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याचं मी जाहीर करत आहे. यावेळी त्यांनी मोफत या शब्दावर भर दिला. तसंच यानंतर एक शेरही त्यांना म्हटला. तुफानों में संभलना जानते है अंधेरों को बदलना जानते है. चिरागों का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में जलना जानते है! असा शेर अजित पवारांनी सभागृहाला ऐकवला. हयात लेके चलो, कायनात लेके चलो चलो तो सारे जमाने को, साथ लेकर चलो. हा दुसरा शेरही काही वेळापूर्वी अजित पवारांनी सभागृहात ऐकवला.