लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चारसौ पार’ चा नारा दिला आहे. परंतु त्यामागे देशाची राज्य घटना पार बदलून टाकण्याचा आणि देशाची संपूर्ण लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

आणखी वाचा-उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणच्या प्रचार सभांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या स्थानिक विकास प्रश्नांसह देशातील विविध जटील प्रश्नांवर भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, भाजपचा यंदा लोकसभा निवडणुकीत चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. परंतु एवढ्या प्रचंड बहुमताने देशाचा विकास करायचा नाही. तर देशातील लोकशाही समूळ नष्ट करून संविधान पूर्णतः बदलून स्वतःची व्यवस्था भाजपला आणायची आहे. हा इरादा आपण कोणी बोलून दाखवत नाही तर खुद्द भाजपचेचे नेते बोलून दाखवत आहेत. कर्नाटकातील भाजपचे नेते अनंतकुमार आणि अन्य काही नेत्यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत प्रणिती शिंदे यांनी, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भूलथापांना बळी पडून त्यांना साथ दिली तर संविधान बदलून टाकण्याचे आणि लोकशाही व्यवस्था समूष्ट नष्ट करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होईल, असा इशारा दिला.

Story img Loader