सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या सदस्यांना गोवा सहलीला पाठविले होते. सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. भाजपाकडून संगीता खोत, सविता मदने यांनी अर्ज दाखल केले होते. मदने यांनी सकाळी अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत खोत यांना ४२ तर काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांना ३५ मते मिळाली. त्यानंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडीत धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेत सत्तांतर होत भाजपाने पहिल्यांदाच बहुमत मिळवले होते. महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपाचे ७८ पैकी ४२, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ३५ सदस्य आहेत. स्वाभिमानी विकास आघाडीचे विजय घाडगे एकमेव सदस्य आहेत. महापौरपदासाठी भाजपाकडून संगीता खोत, अनारकली कुरणे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, कल्पना कोळेकर आदी इच्छुक होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर, उपमहापौरपदासह सर्व निवडीचे अधिकार भाजपाचे शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेशउपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, दीपक शिंदे या कोअर कमिटीला दिले होते.

महापौरपदासाठी काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर तर उपमहापौरपदासाठी स्वाती पारधी यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps sangita khot elected as mayor of sangli miraj kupwad municipality and dhiraj suryawanshi deputy mayor