महापुरूषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात काळी शाई फेकण्याची घटना ताजी असतानाच सोलापुरात भाजपाचे माजी मंत्री, आमदार विजय देशमुख यांच्याही अंगावर काळी शाई फेकण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. सोलापुरात आयोजित एका लग्नसमारंभात हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी शाईफेकणाऱ्या तरुणाला पकडले आहे.

हेही वाचा- शाईफेक प्रकरण नडलं! पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली

Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Man Beaten in bhopal court
आंतरधर्मीय विवाहासाठी कोर्टात गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण, तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई

सोलापूरातील न्यू बुधवार पेठेत बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आमदार देशमुख गेले होते. त्यावेळी गर्दीत अचानकपणे लाल पोशाख परिधान केलेल्या एका तरूणाने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भाजपाचे जबाबदार मंत्री व इतर नेत्यांवर कारवाई न करता सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आमदार देशमुख यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या घटनेमुळे सामूहिक विवाह सोहळ्यात गोंधळ उडाला.

हेही वाचा- ठाकरे गटाचे आणखी एक नेते अडचणीत; आमदार राजन साळवींची उद्या ‘एसीबी’कडून चौकशी

दरम्यान, तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी संबंधित तारूणाला जागेवर पकडले. या घटनेनंतर आमदार देशमुख हे सुध्दा विचलित न होता अंगावरील शर्ट बदलून पुन्हा मोठ्या मनाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले.

Story img Loader