काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर हा तसा बघण्यासाठी दुर्मिळच. पण अशाच एका ब्लॅक पँथरचं सिंधुदुर्गच्या कुडाळमधल्या गोवेरी गावातल्या गावकऱ्यांना अचानकच दिसला. खरंतर काळा बिबट्या जंगलात दिसणं सामान्यपणे अपेक्षित केलं जातं. मात्र, गोवेरीच्या गावकऱ्यांना मात्र चक्क पाण्याच्या टाकीत बिबट्याचं आयतं दर्शन झालं. तो तिथे कसा पोहोचला हे अद्याप समजू शकलेलं नसलं, तरी गावकऱ्यांनी याचि देही याचि डोळा बिबट्या पाहाण्याचा अनुभव यानिमित्ताने घेतला!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं झालं काय?

कुडाळच्या गोवेरी गावात एका पाण्याच्या टाकीत बिबट्या पडल्याची माहिती तिथल्या वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी तातडीने तिथे पोहोचले, तेव्हा गावातल्या एका पाण्याच्या टाकीमध्ये बिबट्याचं एक पिल्लू पडल्याचं अधिकाऱ्यांना लक्षात आलं. त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.

वैद्यकीय चाचणीनंतर बिबट्या सुरक्षित अधिवासात

बऱ्याच मेहनतीनं अधिकाऱ्यांना या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढण्यात यश आलं. हे पिल्लू साधारण २ वर्षांचं असल्याचं वन अधिकाऱ्यांना लक्षात आलं. नर जातीच्या या बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित वनअधिवासात सोडून देण्यात आले.

काळा बिबट्या ही एक अत्यंत दुर्मिळ बिबट्याची प्रजात असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होतो. बिबट्या हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवर ते उपजीविका करतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black panther found in sindhudurg water tank left after medical check up pmw