अलिबाग: आऱसीएफ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पात बुधवारी संध्याकाळी स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक झाले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिली.
थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टीलायझर्स् लिमिटेड कंपनीच्या थळ येथील प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लांट मध्ये नवीन वातानुकूलीत यंत्रणा बसविण्याचे काम सुरु होते. ऍरिस्टो ट्रोटल नामक कंपनीला ही यंत्रणा बदलण्याचे काम देण्यात आले होते. कंपनी मार्फत वातानुकूलन यंत्रणा बसवितांना संध्याकाळी पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात सहा कर्मचारी गंभीर जखमी झालेत. त्यांना आरसीएफ कंपनीच्या कुरूळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांचा मृत्यू झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळतांच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तहसिलदार मिनल दळवी घटना स्थळी दाखल झाले आहे.
आरसीएफ स्फोटातील जखमी व मयत व्यक्तींची नावे
साहिद मोहम्मद सिद्दीकी २३ वर्ष, जितेंद्र शेळके, वय ३४, अतिनदर मनोज, हे तिघे जखमी आहेत.
खालील तीन जण मयत
अंकित शर्मा, फैजून जुनेद शेख (३२), दिलशाद आस्लाम इदनिकी (२९)