रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील ‘डिव्हाईन’ कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. चिपळूणमध्ये घडलेल्या या घटनेत आठ ते नऊ कामगार गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कामगारांना चिपळूणच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

“फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, राज्यात मध्यावधी…”, संजय राऊतांचं सूचक विधान!

घटनास्थळी स्थानिक अधिकारी दाखल झाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वेल्डींग सुरू असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Story img Loader