सांगली कवठेएकंद येथे शोभेची दारू बनवण्या-या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ईगल असे या कारखान्याचे नाव असून, कवठेएकंद हे गाव शोभेची दारू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
सोमवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्याला आग लागली. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की शोभेची दारू बनविल्या जाणाऱ्या दोन इमारती पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्या.
दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शोभेची दारू बनवण्यासाठी लागणारे कच्चे सामान कारखान्यात असल्याने आगीने आणखीनच पेट घेतला.

Story img Loader