अकोला जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक आणि भयंकर घटना समोर आली आहे. अंध दाम्पत्याला निर्जनस्थळी नेण्यात आलं. त्त्यानंतर तिच्या पतीसमोरच तिच्यावर तीनवेळा बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमकी काय घडली घटना?

अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामधलं एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस या ठिकाणी त्यांच्या मुलीला भेटायला चाललं होतं. या दाम्पत्याची मुलगी अकोल्यात आजीजवळ राहात होती. या मुलीला भेटण्यासाठीच हे दोघं या ठिकाणी आले होते. अकोला बस स्टँडला उतरून ते गावाच्या दिशेने चालले होते. त्यासाठी त्यांनी रिक्षा केली. ही रिक्षा रस्त्यात बंद पडली. यावेळी दिग्रसमध्ये खूप पाऊसही पडत होता. खूप पाऊस पडतोय तुम्ही येऊ नका असं कुटुंबातल्या लोकांनी या दोघांना सांगितलं. यानंतर दोघांनी पुन्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊन पोलिसांच्या सुरक्षेत राहू असं या दोघांना वाटलं होतं. वाटेत त्यांना एक व्यक्ती भेटला. त्याने या दोघांनाही स्टेशनला घेऊन जातो सांगत निर्जनस्थळी नेलं. तिथे पतीच्या समोरच त्याच्या अंध पत्नीवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला. तुझ्या पतीला चाकूने ठार मारेन अशी धमकी देत या आरोपीने अंध महिलेवर तीनवेळा बलात्कार केला. या प्रकाराला विरोध दर्शवणाऱ्या पतीला त्याने गळा दाबून एका बाजूला बसवलं त्यानंतर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. पती अंध असल्याने त्यालाही विरोध करता आला नाही. ३१ मार्चच्या रात्री ही घटना घडली आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Rape of minor girls in Vasai and Nalasopara
Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
Rape of a school girl by giving her alcohol crime against minors and friends
शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा
pune, firing case
पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार, ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल
Girlfriends daughter raped absconding accused arrested after 4 years
वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार, फरार आरोपीला ४ वर्षांनी अटक

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला केली अटक

या घटनेनंतर अंध दाम्पत्याने अकोल्यातलं सिव्हिल लाइन्स हे पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. या दोघांनीही जो भाग सांगितला होता तिथे आसपास सीसीटीव्ही आहेत का हे पाहिलं. त्यानंतर आरोपीची ओळख पटवली आणि गुलाम रसूल शेख मतीनला अटक केली. कलम ३७६ आणि अपंग अधिनियम अंतर्गत या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी ही माहिती दिली.

पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने अकोला हादरलं असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे अशी चर्चा लोक करत आहेत. मुंबई तकने या संदर्भातले वृत्त दिले आहे.