Mumbai BMC Budget 2024-2025 Updates : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना कोणत्या सवलती मिळणार, शिक्षण-आरोग्यासाठी काय सुविधा मिळणार आणि मालमत्तासह अनेक कररचनेतून सवलत मिळतेय का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दुसरीकडे मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ काँग्रसेचे बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलासह अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसणार आहे. तसंच, मराठा आरक्षणाची अधिसूचना निघाल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे गटातील आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांवर शिवीगाळ केली. त्यामुळे यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहेत. तर, राज्यातील तापमानातही गेले काही दिवस सातत्याने घट होतेय. त्यामुळे यासह राज्यातील अनेक घडामोडी पाहुयात.
सांगली : शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवनू सुमारे एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झालेल्यामध्ये एका वकिल महिलेचाही समावेश आहे.
ज्या लोकांना मेहनत करायची नसते ते चारशेचे स्वप्नही पाहत नाहीत, असा टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना हाणला.
शिरोळ तालुक्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडी पडली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा केली.
Attended the meeting with Tribal Affairs Minister Shri Arjun Munda regarding issues with respect to implementation of the Forest Rights Act in Maharashtra. pic.twitter.com/MwvL4zjzTL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 2, 2024
कोल्हापूर : हातकणंगले नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. हातकणंगले नगरपरिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये झाली. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. या वर्षीच्या डिसेंबर अखेर त्यांचा कार्यकाळ होता. या निवडणुकीत निवडून आलेले ते काँग्रेसचे एकमेव उमेदवार होते.
सर्व पक्षांना समान न्याय देऊन शहराच्या विकासासाठी त्यांची धडपड सुरू होती. मनमिळावू स्वभावाचे जानवेकर यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. यापूर्वी त्यांच्या पत्नी अर्चना जानवेकर या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.
घटनेचे गांभीर्य, गुंतागुंत, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या, फसवणुकीतून झालेले व्यवहार लक्षात घेता तपासासाठी ‘एसआयटी’ गठीत करण्यात आली आहे.
कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरे वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय योजना करा. तसेच, रेल्वे स्थानक परिसर पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे असावेत या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी उच्चपदस्थ वाहतूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत केल्या आहेत.
नागपूर : सर्वांत मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासी जमातींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर प्रकार प्रकाशात आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ८१४ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २१६ पदांमध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासींसाठी एकही जागा राखीव नसल्याने हा आरक्षण संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.
पनवेल: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये आयोजकांच्या हलगर्जीपणाविरोधात पनवेल न्यायालयात शुक्रवारी या प्रकरणाचे कामकाज चालविले गेले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड असिम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणातील महत्वाचे कागदपत्रे आज न्यायालयासमोर सादर करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या (कोस्टल रोड) दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या १८ फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केली. मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.
पैशांसाठी एटीएम यंत्रच कापण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
बुलढाणा: जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्यावतीने चिखली येथे १२ जानेवारीपासून सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाकडे शासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष कायम आहे. याचा निषेध म्हणून तीन पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेत अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन शुक्रवारी अमळनेर येथे झाले. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात असा खडा सवाल संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केला.
नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या लेखाअनुदानात विदर्भात नवीन कोणताही प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अजनी सॅटेलाईट स्टेशनसाठी ७.५ कोटी मिळाले आहे.
नागपूर : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या एका प्रवाशाला अपस्मारचा झटका आल्याने विस्ताराचे विमान नागपुरात गुरुवारी वैद्यकीय आपातकालिन स्थितीत (इमजरन्सी लँडिंग) उतरवण्यात आले.
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडीतील मित्रपक्षांस सोडल्या जाणार असल्याच्या चर्चेने निष्ठावंत काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने वर्धेची जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटास सोडण्याचे ठरविले व तयारीसाठी कामाला लागण्याची पवारांची सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ऐकली. यामुळे काँग्रेस नेते, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले.
नागपूर : सरकारी रुग्णवाहिकामधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. त्यामुळे हा रुग्णवाहिका महाघोटाळा थांबवला नाही तर मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दिला आहे.
उरण : मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का व उरणच्या करंजा आणि अलिबागच्या रेवस या उरणला जोडणाऱ्या शंभर कोटींच्या दोन्ही जलमार्गावरील रो- रो जलसेवेचे काम रखडले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून या मार्गावरील काम अपूर्णच आहे.
पनवेल: खारघर वसाहतीमधील चो-यांचे प्रमाण कमी होत नाही. पोलीसांचे अपुरे मनुष्यबळ हे एक कारण आहेच. मात्र पोलीसांपेक्षा चोरांची बंद घरांवर टेहळणी करणारी टोळी अधिक सक्रीय झाल्याचे उजेडात येत आहे.
नागपूर: स्वत:च्या सुटकेसाठी इंग्रजांकडे माफीनामा मागणाऱ्या आणि तुरुंगातील सुटकेनंतर स्वातंत्रलढ्याला विरोध करणाऱ्या सावरकारांचा विद्यापीठाकडून उदोउदो केला जात असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याने दहन करण्यात आले.
पनवेल: कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात चोरीचे सत्र सूरुच आहे. गुरुवारी कळंबोली पोलीस ठाण्यात लोखंड बाजारातील गोदाम क्रमांक १९२८ मध्ये ७ लाख ३३ हजार रुपयांचे स्टेनलेस स्टील चोरीला गेल्याची तक्रार व्यापा-यांनी नोंदविली. ही चोरी २५ डिसेंबर ते ९ जानेवारी या दरम्यानमध्ये झाली आहे.
नागपूर : गडचिरोली वनवृत्त सिरोंचा वन विभागाअंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रमध्ये कार्यरत असलेले अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी अशा आठ हत्तींचे ‘चोपिंग’ असल्याने त्यांना हक्काच्या सुट्टीवर पाठवले जात आहे.
नागपूर : राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) वयाची चाळीशी ओलांडलेल्या त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या ५०० रुपयांच्या एवजी ११ प्रकारची तपासणी केल्यास प्रत्येक दोन वर्षांत संबंधितांना ३ हजार रुपयांची प्रतिपुर्ती महामंडळ करणार आहे.
नागपूर : मराठा समाजाबाबत २६ जानेवारीचा सगेसोयरे आणि गणगोत शब्दाचा समावेश असलेली अधिसूचना ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. त्यावरून मराठा समाजासाठी विशेष भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीयवादी भूमिका घेतली, असा आरोप ओबीसी यूवा मंचचे संयोजक उमेश कोर्राम यांनी केला.
मुक्त विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पाच दिवसांचे उद्योजकता आधारीत कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
महसूल उत्पन्नाचे स्रोत
शून्य प्रस्क्रिप्शन धोरण राबणार- अत्यावश्यक नसलेली औषधे वगळून उर्वरित सर्व औषधे रुग्णालयाकडून उपलब्ध करणार
रस्ते विकास – २०९ किमी रस्त्यांची सुधारणा करून सिमेंट काँक्रिटीकरण करणार. आतापर्यंत १२२४ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण, ३९७ किमी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी पाच निविदा मागवणार.
जुन्या गाड्यांच्या विल्हेवाटासाठी नवीन स्क्रॅपयार्ड विकसित करणार. त्यासाठी जागतिक निविद काढली जाणार.
कोळसा वाहतुकीतून रेल्वेला ३ हजार ४२१.२२ कोटींचा महसूल मिळाला असून तो गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत १०.९४ टक्के जास्त आहे.
उरण स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. स्थानकाच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
बेलापूर येथे तयार असलेल्या बहुमजली पार्किंगची सुविधा कार्यान्वित करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.