Mumbai BMC Budget 2024-2025 Updates : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना कोणत्या सवलती मिळणार, शिक्षण-आरोग्यासाठी काय सुविधा मिळणार आणि मालमत्तासह अनेक कररचनेतून सवलत मिळतेय का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दुसरीकडे मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ काँग्रसेचे बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलासह अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसणार आहे. तसंच, मराठा आरक्षणाची अधिसूचना निघाल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे गटातील आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांवर शिवीगाळ केली. त्यामुळे यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहेत. तर, राज्यातील तापमानातही गेले काही दिवस सातत्याने घट होतेय. त्यामुळे यासह राज्यातील अनेक घडामोडी पाहुयात.
पनवेल: सिडको क्षेत्रातील ‘अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क’ आणि ‘बंगलो, रो-हाउस भूखंडांवर बांधण्यात आलेल्या एकापेक्षा अधिकच्या सदनिकांबाबत जनतेस भेडसावणाऱ्या अडचणी विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ‘२०२४ अभय योजना’ सिडको मंडळाला राबविण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात सदनिकेत वडील आणि मुलगा मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नागपूर शहरातून १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
पिंपरी : बेशिस्त वाहतूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची कमतरता आणि वाढता परिसर लक्षात घेता नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, चाकण, शिक्रापूर या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीमुळे कामगार, कच्चा माल कंपन्यांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब झाल्याने उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली.
पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हेल्मेट वापराबाबत जागृती करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.
पनवेल: खारघर वसाहतीमधील सेक्टर २३ येथील अपेजी सत्या इंटरनॅशनल सेंटर महाविद्यालयाच्या इमारतीच्या दूस-या मजल्यावरील प्लंबीगचे सामान चोरी गेल्याची तक्रार महाविद्यालयाच्यावतीने पोलीसांत दिली आहे. ही चोरी २१ जानेवारी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी याबाबत पोलीसांनी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. महाविद्यालयातील दूस-या मजल्यावरील सामान ठेवण्याच्या खोलीच सूरक्षित ठेवलेल्या सामानामध्ये ९० हजार रुपये किमतीचे सामान चोरट्यांनी चोरी करुन पसार झाले. खारघर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी सादर केला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो 10.50 टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 54256.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मागील वर्षी सादर करण्यात आला होता.
मुंबई महानगरपालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातपोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मालमत्ता करापोटी पालिकेला 31 जानेवारी 2024 पर्यंत 5400 कोटी रुपयांपैकी केवळ 605.77 कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. मात्र त्याच वेळी विकास नियोजन खात्याला मिळालेल्या महसुलामुळे पालिकेला मदतीचा हात मिळाला आहे. चालू वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत 4028.18 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. या वर्षात विकास नियोजन शुल्कापोटी 4400 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र ते सुधारून 5500 कोटी रुपये करण्यात आले होते. त्याचबरोबर मुदत ठेवींमधील गुंतवणुकीपोटी 2206.30 कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत.
कोल्हापूर : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासणारे सर्वेक्षण अचानकपणे थांबवले. ‘सगे सोयरे’च्या व्याख्येत न बसणारे तसेच कुणबी नोंदी न सापडणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळण्याचे एकमेव साधन आयोगाचे सर्वेक्षण होते. ते अचानक थांबवण्यात आले आहे. त्यावरून संशयाचे वातावरण मराठा समाजात तयार झाले आहे. ते सर्वेक्षण का थांबवले यावर सरकारने खुलासा करावा अशी मागणी योगेश केदार (आंदोलक, सकल मराठा समाज) यांनी केली आहे.